मुंबई

 या एका निर्णयामुळे पाच हजार कैदी घरी  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील अनेक तुरुंगातून 5 हजार 105 कैद्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. तर टप्याटप्प्याने आणखी 11 हजार जणांची सुटका करण्यात येणार आहे. 

हे वाचा : सलूनसाठी मोठा निर्णय

तुरुंग प्रशासनाच्या वतीने कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी करुन त्यांना सोडण्यात येत आहे. काही तुरुंगात "टेम्परेचर गन'च्या सहाय्याने कैद्यांची चाचणी करुन त्यांना सोडण्यास सुरुवात केली आहे. काही कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय अहवाल हाती आले नाहीत. ते आल्यानंतर त्यांना दोन टप्यात सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सागंतिले. तसेच राज्यातील विविध मध्यवर्ती आणि जिल्हा तुरुंगातील कच्च्या कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया देखील कारागृह प्रशासनाने सुरू केली आहे. 

सर्वोच्य न्यायालयाचे आदेश आल्यानंतर सरसकट कैद्याना बाहेर न सोडता त्यांच्याकडून जामिनपत्र लिहुन घेतले जात आहे. त्यानुसार, त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. वैद्यकीय अहवाल व्यवस्थित असेल अशाच कैद्याना जामीनावर बाहेर सोडले जात आहे. 


हे वाचा : अशी होते अमली पदार्थाची विक्री

त्यानुसार, लॉकडाऊनच्या कालावधीत 5 हजार 105 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून 582 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ तळोजा 498, ठाणे 443 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे . असेच पुढेही टप्याटप्याने 11 हजार कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. जामिनावर सोडलेल्या कैद्यामध्ये सात वर्षापेक्षा अधिक तसेच सात वर्षापेक्षा कमी शिक्षा झालेल्या कैदी त्याचप्रमाणे, दोन वेळा पॅरोलवर जाऊन नियमानुसार आतमध्ये आलेल्या कैद्यांना सोडण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सात कारागृहांमध्ये पूर्ण पणे लॉकडाऊन आहे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज रेल्वेसेवेचा प्रारंभ; असे आहे वेळापत्रक

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Ganpati Panchayatan Sansthan Sangli : ‘किमान दोघांना लोळवण्याची ताकद’; अभिनेत्री भाग्यश्रीच्या पूजेवर विजयसिंह राजे संतापले

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंचे मौन सुटले; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’

SCROLL FOR NEXT